मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणे महत्त्वाचे आहे. परंतु अद्यापही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. जर बैठकीचे आयोजन करण्यात येणार नसेल तर अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हटवा अशी, मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतच पत्र देखील केरे पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवले आहे.

याबाबत केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या हितासाठी अशोक चव्हाण यांनी आजपर्यंत एकही बैठक घेतलेली नाही. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी एकाही नामवंत वकिलाची नियुक्ती केलेली नाही.

लवकरात लवकर जर मराठा समाजाच्या हितासाठी आजपर्यंत अशोक चव्हाण यांनी काय निर्णय घेतले हे जाहीर करावे अथवा त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावरून हकालपट्टी करावी. जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले तर आम्ही ९ ऑगस्ट रोजी मोठे जन आंदोलन महाराष्ट्रात उभं करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *