
| मुंबई | कराची स्टॉक एक्स्चेंजवरील हल्ल्यानंतर मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देऊ, अशी धमकी देणारा दूरध्वनी सोमवारी पोलिसांना आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे.
कालच कराचीतील Karachi Stock Exchange इमारतीवर दहशतवादी हल्ला झाला होता. पोलिसांच्या गणवेशातील चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडस फेकले. यानंतर दहशतवाद्यांनी इमारतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरु होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घातले होते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री