
| मुंबई | राज्यातील मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात वैध ठरवण्यासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील हा खटला लढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकिलांची फौज उतरवण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करताना दिसतील.
यापूर्वी राज्य सरकारने हा खटला लढवण्यासाठी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती केली होती. यांच्या जोडीला आता कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील रफीक दादाही हा खटला लढवणार आहेत. कपिल सिब्बल यांनी हा खटला लढावा, यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, शनिवारी सकाळीच मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांनी मराठा आरक्षण उपसमितीशी चर्चा केली.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री