उस्मानाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आमदार कैलास पाटील यांनी पाठविलेल्या व्हॉटसअप मेसेजची दहाव्या मिनिटांत ‘दखल घेतली’ असा रिप्लाय देत सध्या ते किती अलर्ट आहेत हे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या पूर्ण क्षमतेने कोरोनाच्या संकटाचा सामना करताना दिसत आहेत. त्याहीपेक्षा अगदी छोट्या-छोट्या येणाऱ्या सूचनांचा ते तातडीने अवलंब करताना दिसत आहेत. याचाही प्रत्यय उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला पाहायला मिळाला आहे.
आमदार घाडगे पाटील यांनी व्हॉटसअपवर पाठविलेल्या एका निवेदनाला दहाव्या मिनिटात श्री. ठाकरे यांनी रिप्लाय दिला. दुसऱ्या मिनिटाला आमदारांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवर कशाप्रकारे काम सुरू आहे, याचा आढावा घेतला.
आमदारांनी केली होती ही मागणी
आमदार घाडगे पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 108ची रुग्णवाहिका विनाडॉक्टर वापरण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. सध्या रुग्णवाहिकेवर 60 ते 70 टक्के डॉक्टर नसल्याने या रुग्णवाहिका दवाखान्याच्या आवारात थांबून आहेत. त्याचा वापर केला तर ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड थांबणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण ने-आण करण्यासाठी 108 रुग्णवाहिका वापरण्यास आरोग्य विभागास सुचना देण्याची मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केली होती. रात्री उशीरा साडेअकराच्या दरम्यान त्यानी हा संदेश पाठविला होता. त्याला तेवढ्याच तातडीने रिप्लाय दिल्याने आमदार घाडगे पाटील यांना सुखद धक्का बसला.
दुसऱ्या मिनिटात मुख्यमंत्र्यानी थेट फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी आमदार पाटील यांनी जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या दोन रुग्णांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांनी सांगून पोलीसांना याबाबत दक्षतेचे आदेश देण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार पाटील यांनी श्री. ठाकरे यांना सांगितले. मुख्यमंत्र्यानी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाय फोन ठेवताना तुमची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला आमदार पाटील यांना दिला.
बाळासाहेबांनी छत्रपतींचा कारोबार शिवसेनेच्या विचारातून शिकवला, तेच उध्दव कामातून दाखवित आहे।
मानसातला,देव,माणुस,ठाकरे,सरकार