| पालघर | पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. १६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची पालघरमधील गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५४ जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत.
पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सोबतच राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीयआडीकडून एएनआयला देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू कोर्टात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे”.
सीआयडीकडून आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी ८०८ संशयितांची चौकशी करण्यात आली असून १०८ साक्षीदांरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी १५४ जणांना अटक करण्यात आलेली असून ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कोणत्याही आरोपीला जामीनावर सोडण्यात आलेलं नाही अशी माहिती सीआयडीने दिली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .