प्रियांका चतुर्वेदी , भगवान कराड यांची मराठीतून, शरद पवार यांची हिंदीतून तर उदयनराजे यांची इंग्रजीतून शपथ..!

| नवी दिल्ली | राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

देशात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनच्या काळात संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. दरम्यान या सोहळ्यासाठी आज संसदेची दार उघडण्यात आली. देशभरातील एकूण ६२ खासदार निवडून आले असून त्यांचा शपथिविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज केवळ काही मोजक्याचं नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

दरम्यान, भाजपचे खासदार भागवत कराड आणि शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही खासदारांवर राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर शरद पवार यांनी हिंदीतून आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *