| मुंबई | महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिका-याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा दावा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतल भारतीय निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतली असून याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोग अधिका-यांकडून आरोपांप्रकणी सविस्तर अहवाल मागवला आहे.
साकेत गोखले यांनी एकामागोमाग एक ट्विट करत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून सोशल मीडिया चालवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली कंपनी तीच आहे ज्यांना भाजपानेही नियुक्त केलं होतं. ही कंपनी भाजपा नेत्याच्या मालकीची आहे.
साकेत गोखले यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून सोशल मीडिया जाहिरातींवर देण्यात आलेल्या पत्त्याकडेही लक्ष वेधलं आहे. जाहिरातींवर २०२, प्रेसमन हाऊस, विले पार्ले, मुंबई असा पत्ता देण्यात आला आहे. साकेत गोखले यांच्या दाव्यानुसार, हाच पत्ता साईनपोस्ट इंडिया यांच्या नावे होता. या कंपनीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा त्यांचा दावा आहे.
साकेत गोखले यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०२ प्रेसमन हाऊस हा पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजीटल एजन्सीकडूनही वापरण्यात आला होता. ही एजन्सी भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांच्या मालकीची आहे. साकेत गोखले यांनी भाजपा आयटी सेलच्या सदस्याला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिका-याचं सोशल मीडिया हाताळण्याची जबाबदारी का देण्यात आली ? अशी विचारणा केली आहे.
साकेत गोखले यांनी ट्विटरला एकामागोमाग एक अनेक ट्विट केले असून सोशल सेंट्रलचे ग्राहक असणा-यांची यादी शेअर केली आहे. यामध्ये भाजपाशी संलग्न संस्थांचाही समावेश आहे.
दरम्यान देवांग दवे यांनी सर्व आरोप फेटाळले असून निराधार असल्याचे म्हटले आहे. आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपाने अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .