
| औरंगाबाद | कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. संकटकाळात शरद पवार हे सर्व ठिकाणी भेटी देतात. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॅप्टन असं संबोधित करत त्यांची पाठराखण केली. आज खासदार शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मला लोकांमध्ये जाण्याची आवड आहे. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यामुळेच मला राहावत नाही म्हणून मी संकटकाळातही बाहेर जात असतो,” असं पवार यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. तसंच मुंबईत आल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री