| मुंबई | इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधील महत्वाच्या सॅमसंग, लावा, पेगाट्रॉन, डिक्सॉन सारख्या इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांनी भारतात मोबाईल डिव्हाइस आणि त्याचे पार्ट्स बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इनसेन्टिव्ह स्कीम अंतर्गत या कंपन्या पुढील ५ वर्षांमध्ये ११.५ लाख कोटींचे उत्पादन करेल, यामुळे देशात इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंगसाठी प्रोत्साहन मिळेल. या योजनेअंतर्गत एकूण २२ कंपन्यांनी प्रस्ताव दिला आहे.
रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय मोबाईल फोन मॅन्यूफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांनी १५,००० आणि त्यापेक्षा अधिक सेगमेंटमध्ये उत्पादनासाठी अर्ज केला आहे. यापैकी तीन कंपन्या (Apple) iPhone च्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्यूफॅक्चरर्स आहेत.
मोबाईल फोन्सच्या सेल्स रेव्हेन्यूपैकी जवळपास ६० टक्के Apple (३७ टक्के)आणि Samsung (२२ टक्के) आहे. त्यामुळे या योजनेनंतर कंपन्यांचा मॅन्यूफॅक्चरिंग बेस अधिक वाढण्याची संधी आहे.
१२ लाख लोकांना रोजगार मिळणार :
कंपन्यांच्या या प्रस्तावानंतर १२ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यापैकी ३ लाख डायरेक्ट तर ९ लाख इनडायरेक्ट नोकऱ्या असतील. त्यांनी असे म्हटले की, ‘मोबाइल फोनसाठी डोमेस्टिक व्हॅल्यू अॅडिशन सध्याच्या १५-२० टक्क्यांवरून ३५-४० टक्क्यांपर्यंत वाढेल. तर इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसाठी ही ४५-५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .