मुंबई : कोरोना जगभरात महामारी बनत चालला आहे. या विरोधात सगळा देश उभा आहे. अनेक लोकं मदतीसाठी पुढे आले आहेत. यातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मोठी मदत केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया फिल्म एंप्लॉइज कन्फेडरेशन (AIFEC)च्या एक लाख मजुरांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी एका महिन्याचा किराणा माल त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या या निर्णय़ाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. फिल्म एम्प्लॉइज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष अशोक दुबे यांनी ही माहिती दिली. अमिताभ यांनी लोकांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी देश अडचणीत असताना मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक कलाकांरानी मोठी मदत दिली आहे. देशाच्या कठीण काळात आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांनी बीग बींनी मदतीचा हात पुढे केला आहे. याआधी सुपरस्टार रजनीकांत यांनी तमिळ इंडस्ट्रीच्या फिल्म एम्पलॉइज फेडरेशन ऑफ साउथ इंडिया (FEFSI) यांना 50 लाखांची मदत केली होती. तर अभिनेता सूर्या आणि विजय सेतुपती यांनी देखील 10-10 लाखांची मदत केली होती.
लॉकडाऊनमुळे सिनेमांची आणि मालिकांची शूटींग बंद आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे..