भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.
१. दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.
२. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.
३. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
४. परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा.
५. केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
६. केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.
७. जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
८. केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
९. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
१०. अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
१२. केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्ताची कमतरता (Anaemia) असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
१२. मलावस्तंभाचा त्रास असेल तर केळे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, कारण केळे खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.
१३. जर आंत्रव्रण (कोलायटिस) हा आजार झाला असेल, तर अतिरिक्त आम्लांचा विषारी प्रभाव केळे खाल्ल्याने नाहीसा होतो. कारण केळ्यामध्ये आतडय़ांना आतून एक संरक्षक थर जमा होतो व त्यामुळे आंत्रव्रण भरून येण्यास मदत होते व पोटात पडणारी आग कमी होऊन रुग्णास उपशय मिळतो.
१४. कृश व्यक्तींना वजन वाढवायचे असेल तर रोज दुपारी चार केळी खावीत. यामध्ये भरपूर उष्मांक असल्याने महिन्याभरात वजन वाढते. केळ्यामध्ये कमी प्रथिने, कमी क्षार आणि उच्च प्रतीचे पिष्टमय पदार्थ (काबरेहायड्रेट्स) असल्याने मूत्रिपडाचे विकार दूर करण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.
१५. सूर्याच्या प्रखर उष्णतेने किंवा आगीच्या चटक्यांनी होणारी शरीराची आग थांबविण्यासाठी त्वचेवर केळ्याचा गर लावावा, यामुळे शरीराचा दाह कमी होतो. केळ्यामध्ये ए, सी व एच जीवनसत्त्व असल्यामुळे त्वचा, दात यांच्या विकारांवर केळी उपयुक्त ठरतात.
१६. केळफुलामुळे गर्भाशयाच्या तक्रारी दूर करता येतात. कारण केळफुलाच्या सेवनाने शरीरातील अंतस्रावांचे (Harmones) प्रमाण संतुलित करता येते. यामुळे मासिक पाळीत अति रक्तस्राव होत असेल तर केळफुलाची भाजी खाणे उपयुक्त .
१७. केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते व यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना केळफुलाच्या सेवनाने कमी होतात.