भाभीजी पापड खाल्ल्याने कोरोना होत नाही असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण..

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मिम्समधून व्हायरल झालेले केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज या दोन विभागांचे राज्यमंत्री पद हे मेघवाल यांच्याकडे आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याच्या वृत्ताला मेघवाल यांनी दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अर्जुन मेघवाल पापड खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत काही दिवसांपूर्वी भाभीजी पापड या ब्रँडचे उद्घाटन करत असताना मेघवाल यांनी ‘भाभीजी पापड खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूशी लढण्यास मदत होते’ असे अजब विधान केले होते. या पापडांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल असे मेघवाल म्हणाले होते. या विधानानंतर मेघवाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

अर्जुन मेघवाल यांच्याव्यतिरीक्त आणखी एक केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर राजस्थान येथील जोधपूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *