
| मुंबई | कोरोना संकटात राज्य सरकारने आणखी पाच आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिर्डी येथील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने पाच अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री