स्वच्छ शहर सर्वेक्षणात पुन्हा नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर, इतर शहरे आहेत या क्रमांकावर..!

| मुंबई | केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातवा क्रमांक पटकावत होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर नाशिक शहराने ११ वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्र सरकारने नुकतेच ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० ‘ चे निकाल जाहीर केले. यामध्ये इंदुर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदुर ने बाजी पहिला क्रमांक पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नवी मुंबईचा तिसरा क्रमांक लागला आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ’ मध्ये नवी मुंबई शहर देशात सातव्या क्रमांकावर होतं. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचे हे पाचवे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरं कितव्या क्रमांकावर :

नाशिक ११
ठाणे १४
पुणे १५
नागूपर १८
कल्याण डोंबिवली २२
पिंपरी चिंचवड २४
औरंगाबाद २६
वसई-विरार ३२
मुंबई ३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *