| मुंबई | मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठाने दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत.
परीक्षा कधी, गुण किती..?
मुंबई विद्यापीठाच्या या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून MCQ पद्धतीने होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील.
क्लस्टर रचना :
परीक्षा महाविद्यालय स्तरावर
मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्याआयोजना संदर्भात मंगळवारी ८ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री परिपत्रक जारी केले आहे. क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्याअंतर्गत त्या परिसरातील ६ ते ७ विद्यालय अशी मिळून क्लस्टर्स असतील. या एका क्लस्टरमध्ये एका वेळी एका वेळापत्रकानुसार, परीक्षा होतील. प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील.
अभ्यासक्रम कोणता?
सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.
परीक्षा पद्धती नक्की कसे :
सर्व थेअरी परीक्षा ऑनलाइन होतील. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. परीक्षा ५० गुणांसाठी आणि १ तास कालावधीची असेल.
मूल्यांकन :
ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेअरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत, थेअरी परीक्षेचे मूल्यांकन हे ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रुपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने कॉलेजांना दिल्या आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेअरी परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात, (उदा. अतिरिक्त वेळ, लेखनिक इत्यादी.) असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी?
बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून सुरू कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतल्या असतील, तर पुन्हा घेऊ नयेत.
प्रॅक्टिकल / प्रोजेक्ट / व्हायव्हा परीक्षा कशा?
प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांच्या सहाय्याने ऑनलाइन पद्धतीने (झूम अॅप, गुगल मीट, स्काइप आदींवर) किंवा आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे व्हायवा म्हणजेच मौखित परीक्षा घ्यावी. या परीक्षा १५ सप्टेंबर २०२० पासून घ्याव्यात.
परीक्षा हुकल्यास..
जे विद्यार्थी काही कारणास्तव ऑनलाइन थिअरी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना पुन्हा संधी देण्याविषयी क्लस्टरमधील लीड महाविद्यालयामार्फत एकत्रित निर्णय घेतला जाऊन अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा नसल्यास..
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.
विद्यार्थ्यांकडून माहिती घेणार
ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज आहेत की नाही याबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती मागून घ्यायची आहे. यात विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅपनंबर, ई-मेलआयडी, लॅपटॉप आहे की नाही, कोणते गॅजेट उपलब्ध आहे. स्वत:कडे नसेल तर ओळखीतून कुठून उपलब्ध होऊ शकते का? या सर्वाचा तपशील विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म अथवा अन्य माध्यमतून भरून घ्यायची आहे. जर कोणा विद्यार्थ्याकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची शक्यता नसेल त्यांच्यसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची सुचनाही कॉलेजांना देण्यात आल्या आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .