श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन घरगुती गणेशोत्सव सजावट प्रदर्शन २०२० ची पारितोषिके जाहीर..!

| पुणे | सध्या कोरोनाचे संकट गडद होत असताना नुकताच गणपती उत्सव अतिशय सध्या पण पारंपरिक पद्धतीने घरोघरी साजरा केला गेला. या दरम्यान भक्तिमय विचारधारणेतून कार्यरत असलेली युवा शक्ती “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने या वर्षी “घरगुती गणेशोत्सव सजावट प्रदर्शन २०२० (ऑनलाईन)” चे आयोजन केले होते.

यंदाच्या या कठीण परिस्थितीत कोणासही आप्त स्वकियांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणे शक्य नव्हते, याची उणीव भासू नये याकरीता श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे यांनी आपल्या अधिकृत ईमेल आयडी मार्फत सर्वांच्या घरगुती गणेश उत्सवाची छायाचित्रे संकलित करून ती फेसबुक पेजवरून ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित केली. या अभिनव संकल्पनेस सर्वांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

याच प्रतिसादाच्या जोरावर समितीने सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री गणेश उत्सव सजावटीसाठी विशाल माने (बेळगाव), तुषार घुले (मांजरी), शेखर पवार (म. गांधीनगर) अन् श्री गौरी गणपती सजावटीसाठी प्रसाद चिले (लोणी काळभोर) अशी एकूण ४ पारितोषिके ऑनलाईन स्वरूपातच प्रदान केली. या सर्व ऑनलाईन प्रदर्शन प्रक्रियेचे सामाजिक स्तरातून देखील कौतुक होत आहे.

अवघ्या जगावर येऊन ठेपलेल्या संकटाचा सामना करीत असताना प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करत सर्वांनी या वर्षी आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव साजरा केला. तसेच नयनरम्य आरास करून श्रींची भक्तीभावे सेवा केलीत, त्या बद्दल सर्वांचे आभार मानल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी दैनिक लोकशक्ती शी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *