- चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला हा कोविड१९ ने जगभर थैमान मांडले आहे.
- जगातील अनेक देश पूर्णतः लॉकडाऊन आहेत..
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. येत्या १४ एप्रिलला या लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात लॉकडाऊन संपणार की वाढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांसोबत एक बैठक घेतली. त्यात लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी चर्चा झाली. भारताप्रमाणेच जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे.
देशातील अनेक राज्यांनी आता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात अगोदर तेलंगणा सरकारने लॉकडाऊन तीन महिने वाढवले आहे. तीन जूनपर्यंत तेलंगाणामध्ये लॉकडाऊन असणार आहे. तेलंगणा पाठोपाठ आता महाराष्ट्रातही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
खालील देशांमध्ये आहे इतके दिवस लॉकडाऊन..!
१. दक्षिण आफ्रिका : २६ मार्चला २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर ९ एप्रिलला तो ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला.
२. न्युझीलँड : २५ मार्चपासून पूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे.
३. सौदी अरेबिया : २५ मार्चला राजधानी रियाध आणि दोन धार्मिक शहरं लॉकडाऊन केली. २९ मार्चला जेद्दाह लॉकडाऊ केलं. ६ एप्रिलपासून सगळ्या महत्त्वाच्या शहरात लॉकडाऊन आहे
४. नोर्वे : नॉर्वेत १२ मार्चला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन होता. २४ मार्चला तो ईस्टरपर्यंत वाढवण्यात आला. २० एप्रिलपासून थोडी शिथिलता देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
५. डेन्मार्क : डेन्मार्कनं ११ मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर सरकारनं १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
६. जर्मनी : जर्मनीत मार्च महिन्यापासून १६ राज्यात लॉकडाऊन सुरु होता.. सरकारनं त्याचा कालावधी १९ एप्रिलपर्यंत वाढवला आहे.
७. मलेशिया : १६ मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सरकारनं २८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला.
८. भारत – भारतात २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. १४ एप्रिलला संपणारा लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता जास्त आहे.
९. यु. के. – २३ मार्चपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अजूनही लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचार नाही.
१०. ऑस्ट्रेलिया : २३ मार्चपासून अत्यावश्यक नसलेल्या सेवा पूर्ण देशात बंद आहेत.
११. चीन : जानेवारीच्या शेवटाला चीननं देशातील १६ महत्त्वाची शहरं लॉकडाऊन केली होती. त्यातलं वुहान तब्बल ७६ दिवसानंतर आता सुरु झालं आहे.
१२. अर्जेंटिना : २१ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. पण २९ मार्चला लॉकडाऊनचा कालावधी १३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.
१३. इस्राईल : १९ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. परदेशी लोकांना एन्ट्री बंद करण्यात आली. २५ मार्चपासून पूर्ण लॉकडाऊन सुरु आहे.
१४. फ्रान्स : फ्रान्सनं १६ मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. २७ मार्चला तो १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला. रॉयटर्सच्या बातमीनुसार आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढलाय.
१५. स्पेन : १४ मार्चपासून स्पेननं देशात लॉकडाऊन जाहीर केला. आता त्यात २५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
१६. इटली : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीत १३ मार्चपासून लॉकडाऊन आहे.
१७. कुवैत : १३ मार्चला कुवेतमध्ये दोन आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केला. ६ एप्रिलला त्यात वाढ करुन आता २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार.
१८. आयर्लंड : २७ मार्चपासून आयर्लंडमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय लिओ वराडकर यांनी जाहीर केला.
१९ . अमेरिका : US मध्ये पूर्णतः देशात लॉकडाऊन केले नसून अनेक राज्यांनी मात्र ते जाहीर केले आहे.
२०. पाकिस्तान : १४ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आले आहे.