| नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सानोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्य होते. ही समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतला आहे. त्यांनी विविध शहरांसाठी तीस रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. यातील एक रुग्णवाहिका मालेगाव शहराला मिळाली आहे. त्यामुळे येथील कार्यकर्ते, नागिरकांनी आनंद व्यक्त केला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांची वेळेवर ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी पडते. रुग्णांची गरज ओळखून त्यांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी विविध सुविधांची गरज आहे. त्यात प्रामुख्याने रुग्णवाहिकांची उपलब्धता महत्वाची होती. रुग्णांची ही गैरसोय दूर व्हावी, या अनुषंगाने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात तीस रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक अद्ययावत रुग्णवाहिका मालेगाव शहरासाठी उपलब्ध झाली आहे. तीचे लोकार्पण राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे याच्या हस्ते करण्यात आले.
मालेगाव शहरात पहिल्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. सबंध राज्यातील ही स्थिती पाहता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. सर्व स्चतरावरील प्रयत्न, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन पोलिस आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने त्यावर मात करण्यात यश आले होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या वैद्यकीय सेवा मिळण्यात ती उपयुक्त ठरेल, असा विश्वास रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी श्री. भुसे म्हणाले की, गरजू व गरजवंत रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.
यावेळी रुग्णवाहिकेचे नियोजन बघणारे राजू आलीझाड व संदिप मोरे यांना रुग्णवाहिकेच्या चाब्याही सुपूर्त करण्यात आल्या. लोकार्पण प्रसंगी मालेगाव महापालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, सभापती राजाराम जाधव, नगरसेवक भिमा भडांगे, संजय दुसाणे, राजेश गंगावणे, विनोद वाघ, प्रमोद शुल्का आदि उपस्थित होते.
.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .