| इंदापूर / महादेव बंडगर | आजच्या या स्पर्धेच्या युगात आधीच सर्वांची जगण्याची कसरत होत असताना, यातच कोरोना सारख्या महामारीने आपले डोके वर काढले. एकमेकांच्या संपर्कात आल्याने होणाऱ्या या रोगाने माणसाचे माणसाशी असणारे दोर तोडत साऱ्यांनाच आपल्या प्रभावात घेतल्याचे चित्र आहे. तरीही या वैश्विक महामारी समोर खचून न जाता आपल्यातीलच काही जिवंत हाडामासाची माणसं या रोगाशी आपले प्राणपणाला लावून लढत आहेत. यातीलच आरोग्य सेवेतील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे रुग्णवाहिका चालक.त्यांच्या सेवेचा आणि कुटुंबीयांचा गौरव म्हणून त्यांच्यासाठी मा. सभापती बांधकाम व आरोग्य, तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका चालकांच्या स्वास्थ्याचा विचार करत, पुढल्या एक वर्षासाठी स्वखर्चाने चालक बांधवांचा आरोग्य विमा उतरविणार असल्याचे जाहीर केले.
सध्याच्या या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ आरोग्यसेवेची गरज असताना, त्यांच्याकडून होत असणारी सेवा ही नक्कीच वंदनीय आहे. याचसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत इंदापूर येथे विचारमंथन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात या चालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
इंदापूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज राधिका सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंदतात्या वाघ, पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, बारामती लोकसभा मतदार संघ अध्यक्ष अँड शुभम निंबाळकर, आरपीआय तालुका अध्यक्ष संदीप कडवळे, आर पी आय पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नितीन आरडे, श्रमिक पत्रकार संघ तालुका अध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे, दत्तात्रय धडस, सय्यद मॅडम, शरद झोळ, धनंजय कळमकर, दत्तात्रय ठोकळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .