| मुंबई | मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर मनसे आणि शिवसेनेत काय गुफ्तगू झाली असावी अशा चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर, राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. कोरोना काळात अनेक मागण्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. यावेळी वारंवार शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस इथं ही बैठक पार पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तर या बैठकीत नेमकं काय झालं याचे आता तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मग तो लोकल सुरू करण्याचा मुद्दा असो, वाढीव वीजबिलावरोधात असो किंवा भूमीपुत्रांची भरती असो. या सगळ्यावर मनसेनं तीव्र भूमिका घेत तात्काळ बदल करण्याची मागणी सरकारकडे केली.
खरंतर, शनिवारीच मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला वाढीव वीजबिलावरोधात निवेदन दिलं होतं. मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री सचिवालय, नवी मुंबईतील कोकण भवन यांना निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. जर येत्या 15 दिवसात लाईट बिल कमी केलं नाही, तर नवी मुंबई मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी आम्ही आमरण करू असा इशारा दिला आहे.
लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठीही सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत जुंपली होती. यामध्ये भूमीपुत्रांच्या हक्काचा मुद्दाही मागे नव्हता. टपाल वाहन सेवेत होत असणाऱ्या रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे, यासाठी मनसेकडून सर्व प्रथम हात जोडून विनंती अर्ज करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी ही गुप्त बैठक झाली असल्याचंही बोललं जात आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .