| मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अटकेची कारवाई करत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांना केला विरोध
वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी आज अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली. पोलिसांकडे अर्णब यांच्या अटकेसाठी रितसर वॉरंट होता आणि त्यानुसारच पोलिसांनी कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अर्णब यांना अटक करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अर्णब हे पोलिसांशी हुज्जत घालताना व अटकेस मनाई करताना दिसत आहेत. त्यात एका महिला पोलिसाचाही आवाज ऐकू येत आहे. त्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना एक तास घराबाहेर उभे करण्यात आले होते, असा उल्लेख आढळतो. ही बाब लक्षात घेता आता अटकेत असलेल्या अर्णब यांच्या अडचणी दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अर्णब यांना अटकेनंतर थेट अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे अर्णब यांच्या वकिलांनी पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी अटकेची कारवाई करताना मारहाण केली, असा आरोप अर्णब यांच्यावतीने करण्यात आला. दोन जणांनी मला मागून पकडले आणि दोन पोलिसांनी मला मारहाण केली. माझ्या मुलाला व कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा अर्णबच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला. हा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण कारवाईचे चित्रण करण्यात आले आहे, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .