| पुणे | शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे मतदारसंघात भेटत नसल्याचा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विरोधकांकडून सतत केला जातो. यावर माझी आणि आढळराव पाटलांची सतत भेट होत नाही त्यांना मी मतदारसंघातही भेटत नाही असं वाटत असेल. मी कोणाचा दृष्टीकोण बदलू शकत नाही, त्यामुळे मी माझं केलेलं काम सांगतो, असा टोला कोल्हेंनी आढळराव पाटलांना लगावला.
माझ्यावर कुणी आरोप करत असलं तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपण संसदेत किती वेळा बोललो होतो हे आठवावं. कालचा पोरगा संसदेत निवडून आला, तो एका वर्षात बारा वेळा बोलतो आणि तीन टर्म खासदार राहिलेला पहिल्या टर्ममध्ये 8 वेळा बोलत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे, असा सणसणीत टोला कोल्हेंनी लगावला.
तुम्हाला संसदेत बाजू मांडण्याचं काम आहे. बोलायचंय त्यांना बोलू द्या, आपण आपलं काम करत राहायचं, असंही कोल्हे म्हणाले. तसंच शिरुरच्या जनतेसाठी मागील एक वर्षात चांगलं काम करायला मिळालं याचा मनोमन आनंद आहे, असंही कोल्हे म्हणाले.
‘रंगभूमीच्या पटलावरची भूमिका ही स्वतःला मनाप्रमाणे करता येते, मात्र राजकीय भूमिका ही मतदारांच्या मनाप्रमाणे साकारावी लागते. माझ्यातल्या अभिनेत्यावर अन्याय झालेला नाही. जेव्हा मला खरच वाटेल अभिनय करणं ही माझ्यासाठी आत्ता प्रायोरिटी आहे. आणि आत्ता मला हे करावं लागेल तेव्हा ते करण्यासाठी काही गैर आहे असं मला वाटत नाही, असंही कोल्हेंनी नमद केलं.
जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी कुठं कमी पडत नाही, तर काय हरकत आहे एखाद्या राजकीय व्यक्तीचा व्यवसाय सगळ्यांना माहिती झाला तर, असा टोमणाही कोल्हेंनी आढळराव पाटील यांचं नाव न हाणला.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .