| सोलापूर / महेश देशमुख | शेकडो किलोमिटर वरून उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटूंबे ऊस तोडणी करण्यास अगदी लहानांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत स्वता:च्या घरापासून राज्यातील साखर कारखान्याकडे जात असतात. ते ऐन सणाच्या काळात घर सोडतात त्यामुळे त्यांची दिवाळी ही ऊसाच्या फडावरच असते हि गोष्ट लक्षात घेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे आलेल्या ट्रक,टॅक्टर,बैलगाडी वरील सुमारे पस्त्तीस हजार ऊस तोडणी मजूरांना फराळाचे वाटप करत माणुसकी जपण्याचे काम केले आहे.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडील ऊस तोडणीची यंत्रणा सज्ज असून कारखान्याच्या वतीने माढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, इंदापूर, परांडा, मोहोळ या तालुक्यामध्ये नोंदी प्रमाणे ऊस तोडीचा कार्यक्रम सुरु आहे. सर्व ऊस तोडणी करणारे मजूर विविध भागात काम करत आहेत.
त्यांच्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारख्यान्याने गेल्या आठ दिवसापासून कारखाना स्थळावरून ३० टनाची बुंदी व १५ टन चिवडा बनवून तयार केलेला आहे.त्यासाठी जवळपास ७५ लाख रुपयांचा खर्च आलेला असून गोरगरीब ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाना २किलो बुंदी व १ किलो चिवडा यांचे पॅकींग तयार करून उसाच्या फडावरच काम करत असलेल्या ठिकाणी कारखान्यामार्फत पोहोच केले आहेत शुक्रवार पासून प्रत्येक वाहनाच्या टोळीवरील व बैलगाडीच्या ३५ हजार मजूरांना पॅकींग पोहोच करण्याचे काम झाले आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या संकल्पनेतून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा नेहमी सामाजिक उपक्रम राबवित आलेला आहे, यापुर्वी देखील अनेक उपक्रम करत आपली वेगळी ओळख या साखर कारखान्याने आत्तापर्यंत निर्माण केलेली आहे असे कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे यांनी सांगितले. आ.शिंदे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक ऊस तोडणी मजूर यांच्यासह विविध स्तरातुन होत आहे.
” ऊस तोड मजूर सणासुदीच्या काळात स्वता:च्या घरापासून दूर राहत बाहेर जाऊन मजूरी करतात अशा कुटुंबांना, मुलाबाळांना दिवाळीमध्ये गोड काही तरी द्यावे हा विचार मनात ठेऊन कारखान्यामार्फत सोळा हजार कुटुंबांतील मजुरांना प्रत्येकी दोन किलो बुंदीचे लाडू व एक किलो चिवडा याचे पॅकिंग करुन देण्याचे काम केले त्यामुळे त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळेल.
– आमदार बबनराव शिंदे
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .