मिठाई वाटप करत केली आदिवासी वस्तीमध्ये दिवाळी साजरी, DoRBit Foundation च्या शुभारंभ प्रसंगी उपक्रम..!

| पुणे : विनायक शिंदे | देशभर घराघरामध्ये दिवाळी साजरी होत असताना कातकरी आदिवासी समाजाच्या लोकांच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी व्हावी म्हणून DoRBit Foundation च्या वतीने मोहोळनगर अंबडवेट ता. मुळशी येथे मिठाई वाटप करण्यात आले.

हिंजवडी पुणे येथील आयटी अभियंते सेवाभावी वृत्तीने एकत्र येत DoRBit Foundation या स्वंयसेवी संस्थेची स्थापना दिवाळीच्या शुभमुहर्तावर शुभारंभ करण्यात आला. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना मदत व्हावी हा संस्थेचा हेतू आहे. शिक्षण, गरीबांना मदत, ग्रंथालय / वाचनालय स्थापना करणे या क्षेत्रात ही संस्था काम करणार आहे. दर आठवडयाला ग्रामीण शाळांमध्ये जाऊन विदयार्थांना व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण , विज्ञान प्रदर्शन, नवोपक्रमास वाव देणे असे उपक्रम राबविले जातात.

मोहोळनगर अंबडवेट ता. मुळशी येथे ही संस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी व पालक यांच्या उन्नतीकरिता कार्य करणार आहे. या वस्तीमध्ये दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आले. फाऊंडेशनचे विपिन श्रीवास्तव यांनी या कामी पुढाकार घेतला. मोहोळनगर शाळेतील शिक्षिका प्रिती टिळेकर- शिंदे व मुख्याध्यापिका मंगल मारणे यांनी समन्वयाचे काम केले.

मिलिंद इंगुलकर यांनी डोरबिट फाउंडेशन संस्थेच्या वतीने समाजातील लोकांना दिवाळी मिठाई वाटप केले. या प्रसंगी मुळशी तालुका पोलिस मित्र संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अभिजित जाधव , श्री शंकर भाऊ सुतार (अध्यक्ष वाढेश्वर प्रतिष्ठान ) अतुल सुतार, चेतन सुतार, किरण सुतार, समीर सुतार, दिपक गुरझडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

” DoRBit Foundation च्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती, कंपन्यांचा सीएसआर फंड यांच्या सौजन्याने दुर्बल घटकांसाठी काम करणार आहोत, पारदर्शी पध्दतीने काम करत या स्वंयसेवी संस्थेकडून गरजू लोकांसाठी जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचे काम करणार आहे. “
– विपिन मोहित श्रीवास्तव, सदस्य, DoRBit Foundation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *