दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |
मुंबई : पत्रकार राहुल कुलकर्णी यांना चुकीची बातमी दिल्याबद्दल काल अटक झाली होती. त्यांच्या बातमीमुळे वांद्र्यात गर्दी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर abp माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी मांडलेल्या भूमिकेवर सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत..! त्यांची उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे..
राजीव खांडेकर यांना सोशल मीडियातून विचारण्यात आलेले प्रश्न :
१) तेलंगणा राज्यातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांमधला गोपनीय पत्रव्यवहार तुमच्या रिपोर्टरकडे कसा आला ? सरकारी दस्तऐवज चोरले का ?
२) त्या पत्रात फक्त “मजुरांची माहिती गोळा करा, ट्रेन चालू करण्याचा ‘प्रस्ताव’ आहे. एव्हढेच लिहलेले असताना ABP माझा च्या बातमीत नांदेड वरून २० गाडया सुटणार, औरंगाबादचे ३००० मजूर गावी सोडणार, डब्ब्याला कुलूप लावून डायरेक्ट स्टेशन वर सोडणार हे कुठून आले ? हे तर त्या पत्रामध्ये नाही आहे.
३) रेल्वेने स्पष्ट केले की मीडियाने internal परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला..तुम्ही बातमी दाखवताना रेल्वे अधिकारी किंवा रेल्वे विभागातील अधिकाऱ्याचा बाईट का दाखवला नाही ? त्यांची अधिकृत भूमिका कुठे ?
४) तुम्ही म्हणता की ९ वाजताच्या नंतर बातमी दाखवली नाही, पण ABP माझा च्या वेबसाईट अन फेसबुक पेजवर 11:30 वाजता बातमी टाकली आहे. मोदीजी यांनी १० वाजता लॉक डाउन वाढवण्याची घोषणा केल्यावर पण आपण ही बातमी वेबवर कशी टाकली ?
५) तुमची बातमी खरी आहे तर नऊ वाजता प्रसारित केलेली बातमी आपण आपल्या वेबसाईट, youtube वरून डिलीट का केली ?
६) बांद्रा येथील गर्दी कशाने झाले याचा पोलीस शोध घेतील पण फेक बातमी चालवल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का करू नये ?
७) सावरकर यांच्यावरील चर्चेत फक्त हेडिंग चुकली म्हणून तुम्ही सगळ्यांची माफी मागीतिली, मग इथे फेक बातमी दाखवून सुद्धा आपण माफी का मागितली नाही ?
८) देशात हिंदी व प्रादेशिक हजारो चॅनेल आहेत, त्यांच्यावर रेल्वे सोडणार अशी कोणतीच बातमी नाही. फक्त abp माझावरच कशी ?
९) कोणतीही बातमी दिल्यावर अधिकारी-प्रशासन यांचा अधिकृत बाईट किंवा quote बातमीत असतो..इतक्या मोठ्या बातमीत राज्य सरकार किंवा रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा बाईट का नाही?
१०) तुमच्या बातमीमुळे लोक जमली नाहीत असा तुमचा दावा आहे, पण तुम्ही दिलेली बातमीच चुकीची आहे याची जबाबदारी कोण घेणार ?