दमदार मुलाखत : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधकांवर बरसणार, उद्या मुलाखत प्रसारित होणार ..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षाने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्ती निमित्त शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत उद्या प्रसारित होणार असून, तत्पूर्वी या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असे नाव देण्यात आले आहे. उद्या(27 नोव्हेंबर)ला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. या मुलाखतीच्या प्रोमोत दाखवल्याप्रमाणे राज्यातील कोरोनाची स्थिती, विरोधकांकडून होणारी टीका, अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य कले आहे.

या प्रोमोमध्ये संजय राऊत मुख्यमंत्री ठाकरेंना म्हणाले की, ‘हे महाविकास आघाडीचे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, अशी भाकिते अनेक ज्योतिषांनी वर्तवली आहेत?’ यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘सरकार पडेल असे म्हणणाऱ्याचे दात पडत आले.’ तसेच, ‘ सुडाने वागायचे असेल तर मग तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढतो’, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

पुढे संजय राऊत मुख्यमंत्र्यांना प्रश्न करतात की, ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कसं वाटत? महाराष्ट्र मोठ राज्य आहे, मग महाराष्ट्र हे आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलीकडे काय करतात?’ त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात, ‘ठिक आहे, आता हात धुतो आहे , जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन…’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *