ही माझ्यासाठीच नाही तर राज्यातील सर्व पेन्शन फायटर यांच्या साठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे – वितेश खांडेकर

| नाशिक | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्यातील पेन्शन फायटर सोबत संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्या अंतर्गत नाशिक मध्ये दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित दिंडोरी येथे राज्य कार्यकारिणीच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी पत संस्थेबाबत गौरवोद्गार काढताना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले की, या पतसंस्थेत येऊन मला आपलेपणाची, आपली अशी एक वेगळीच भावना मनात निर्माण झाली आहे. हे उभे करणे खरचं जिकिरीचे काम आहे, ते आपण साध्य केले म्हणून वडजे सर आपला अभिमान वाटतो.”

दरम्यान, नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हाध्यक्ष श्री सचिन वडजे हे या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या भेटीदरम्यान राज्याध्यक्ष खांडेकर यांच्यासह राज्य सचिव गोविंद उगले, राज्य माध्यम प्रमुख प्राजक्त झावरे पाटील, राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे, विश्वस्त व स्वराज्य मंडळ नगरचे विश्वस्त बाजीराव मोढवे, विश्वस्त व जिल्हाध्यक्ष नदीम पटेल, विभागीय अध्यक्ष मिलिंद सोळंकी, नगर संघटनेचे पदाधिकारी व स्वराज्य मंडळाचे नेते योगेश थोरात व ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रपूर सावलीचे पदाधिकारी लखन साखर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांचे पतसंस्थेतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.

ही माझ्यासाठीच नाही तर राज्यातील सर्व पेन्शन फायटर यांच्या साठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे. वडजे सर या ध्येयवेड्या पेन्शन फायटर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही पतसंस्था निर्माण केली आणि अल्पावधीतच नावारूपास आणली हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असेही राज्याध्यक्ष खांडेकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान पतसंस्थेचे कामकाज व पतसंस्था तर्फे राबविण्यात येणारे विविध योजना, लाभांश याची माहिती तसेच जिल्ह्यातील संघटनेच्या कामकाजाची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन वडजे यांनी उपस्थितांना दिली. संघटनेचे राज्य संघटक प्रविण गायकवाड यांच्यासह सर्व राज्य, जिल्हा व तालुका टीम अतिशय समर्थपणे नाशिक जिल्ह्यात काम करत असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष सचिन वडजे यांनी सांगितले.

दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित दिंडोरी जिल्हा नाशिक या पतसंस्थेचे खूप मोठी प्रगती होऊन सभासदाचे हित जोपासणारे पतसंस्था म्हणून राज्यात नावारूपास येईल अशी सदिच्छा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे राज्य सचिव गोविंद उगले यांनी दैनिक लोकशक्ती शी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *