
| मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ या नावाने राज्य सरकार नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे.
शरद पवार हे राज्यासह देशातील राजकारणातील महत्वाचे प्रस्त आहे. कृषी, रोजगार अशा विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी सरकारने योजनेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलाय.
केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. या बाबतची सविस्तर माहिती एका खाजगी वाहिनीवर प्रसारित होत आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री