| नवी दिल्ली | सरकारला जे लोक आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषीत केलं जाऊ शकतं तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाईही होऊ शकते, असं मत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. ८७ वर्षीय अमर्त्य सेन हे सध्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. अमर्त्य सेन यांनी ई-मेलच्या माध्यमातून पीटीआयला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी देशात चर्चा आणि विरोधी विचारांमधील मोकळीक कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सेन यांनी दावा केला की, “शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने वापर करणारे कन्हैया, खालिद किंवा शेहला सारख्या युवा आणि दूरदृष्टी ठेवणाऱ्या नेत्यांसोबत राजकीय संपत्तीसारखा व्यवहार करण्य़ाऐवजी दडपशाहीप्रमाणे वागणूक दिली जात आहे. उलट त्यांना शांततापूर्ण प्रकारे पुढे जाण्याची संधी द्यायला हवी होती. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थनही सेन यांनी केलं.
नुकतेच, विश्वभारती विद्यापीठाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला अतिक्रमण करणाऱ्यांची एक यादी पाठवली आहे. या यादीत प्राध्यापक अमर्त्य सेन यांच्या नावाचाही समावेश आहे. विद्यापीठाचं म्हणणं आहे की, विश्व भारतीच्यावतीने सेन यांच्या दिवंगत वडिलांना कायदेशीररित्या भाड्यानं दिली होती.
दरम्यान, सेन यांनी आपण विद्यापीठाच्या कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केल्याचा इन्कार केला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अमर्त्य सेन यांना पाठिंबा दर्शवला असून त्यांच्यावर लावलेल्या आरोपांना बिनबुडाचं म्हटलं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .