
| अकोले | गुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्योजकांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले यास धरणात जलसमाधी मिळाली, तर वाहनातील इतर दोघे उद्योजक शेखर सत्याराज गुरू व समीर राजूरकर पोहून सुखरूप पाण्याबाहेर पडल्याने बचावले.
शनिवारी रात्रीच्या वेळेस कोल्हापूर येथील, पण पुणेस्थित शेखर सत्याराज गुरू व समीर राजूरकर (कोल्हापूर) हे दोन उद्योजक आपल्या चारचाकी वाहनातून अकोल्यातील कळसूबाई शिखरावर ट्रेकिंग करण्यासाठी कोतूळ मार्गाने गुगल मॅप सर्च करून प्रवास करत होते. रात्रीची साधारण दोन वाजेची वेळ होती.
गुगल मॅपवर कोतूळहून अकोल्याकडे जाणारा रस्ता वाहनचालकाला दाखवण्यात आला खरा, पण तो रस्ता पावसाळ्यात पिंपळगावखांड धरणात पाणी अडवल्यावर वाहतुकीस बंद होतो. कारण कोतूळ येथील या मार्गावरील पुलावरून सुमारे २० फूट उंचीचे पाणी असते. मात्र या मार्गाने जाणारा हा वाहनचालक नवखा असल्याने त्याने पाण्यापर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून गाडी नेली. पाणीसाठ्याचे चित्र पाहून त्याने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी थेट धरणात गेली.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री