| प्रकाश संकपाळ / कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार, घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रात २५ मे २०२० पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे.राबविण्यात येणा-या शुन्य कचरा मोहिमे अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुस-या रविवारी जूने व टाकाऊ कपडे महापालिकेच्या संकलन केंद्रावर संकलित करण्याबाबत केलेल्या आवाहनाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे
या उपक्रमात गोळा झालेल्या पिशव्यांपासून ‘सक्षम महिला बचत गटा’च्या अध्यक्षा सौ.श्वेता मोहिते यांच्या माध्यमातून कापडी पिशव्या बनविण्यात आल्या आहेत. नागरिकांना परवडतील अशा वाजवी भावात असून या कापडी पिशव्या पाच रुपये प्रति पिशवी या दराने देण्यात येत आहेत
सक्षम महिला बचत गटाच्या सदस्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले, दुकानदार आणि नागरिक यांना या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. टाकाऊ ते विकाऊ ही संकल्पना घेऊन सक्षम महिला बचत गटाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये परिवर्तन घडविण्याचे कार्य सौ श्वेता मोहिते व त्यांच्या सहकारी करत आहेत.
या त्यांच्या उपक्रमाला कोषाध्यक्ष शिल्पा गुददड, सचिव सुवर्णा पदमुख, किशोरी आचरेकर, प्रियांका विचारे, साक्षी पाटील, सविता वैद्य, अश्विनी बोजा यांची साथ लाभली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून आयुक्तांनी देखील या महिलांना प्रोत्साहन देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.