| मुंबई | वोटर आयडी म्हणजेच मतदान ओळखपत्र आता डिजिटल (Digital Voter Id) झालं आहे आणि ते तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करु शकणार आहात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने २५ जानेवारी २०२१ रोजी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे Electronic Electoral Photo Identity Card (ई-ईपिक) वाटप सुरू करणार असून मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाइल किंवा संगणाकावर डाऊनलोड करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. याचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग २०११ या वर्षापासून दरवर्षी २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या देश पातळीवरील मुख्य कार्यक्रम भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे आयोजित करतात. राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करतात.
या कार्यक्रमात नवीन मतदारांना मतदान ओळखपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून हाती घेतलेल्या उपक्रमांच्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरू करणार आहे.
असं करता येणार ई-मतदार ओळखपत्र
✓ सर्व प्रथम https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेतस्थळाला भेट द्या.
✓ यानंतर तुम्हाला लॉग-ईन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता.
✓ वेबसाईटवर लॉग-ईन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा.
✓ २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१४ नंतर तुम्ही वोटर आयडी डाऊनलोड करु शकणार आहात.
दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शाळा- महाविद्यालयांमध्ये वाद-विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊन मर्यादित स्वरुपात हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान आणि मुख्य अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, राज्याचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अभिनेत्री व सदिच्छादूत निशिगंधा वाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .