- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार, २० एप्रिल
मुंबई : कोरोना कोव्हीड १९ विरोधातील युद्धासाठी संपुर्ण देश एकवटलेला असताना यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येवू लागले आहेत. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनीसुद्धा देशातील जनतेला मदतीसाठी आवाहन केले व त्यासाठी स्वतंत्र असा पीएमकेयर्स हा फंड तयार करण्यात आला..
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी सुद्धा आता ही मोहीम हाती घेतलेली असून एकमेकांना नॉमिनेट करून पीएमकेयर्स मध्ये मदत केल्याच्या पोस्ट सोशलमिडीयावर येत आहेत.. पण मा. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलेली वेबसाइटची लिंक आणि महाराष्ट्रातील बीजेपी नेत्यांनी शेयर केलेली लिंक यात फरक असल्याने नेमकी कोणती लिंक खरी आणि खरचं मदत योग्य ठिकाणी पोहचत आहे की नाही याबाबत शंकेचे वातवरण तयार झालेले आहे. महाराष्ट्रातील माजी प्रदेशाध्यक्ष, माजी दिग्गज मंत्री, आमदार, नेते आदींनी ही चुकीची वेबसाईट शेअर केल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे हा नक्की भ्रष्टाचार आहे की शुद्ध बेजबाबदारपणा आहे, या बाबत सोशल मीडियातून जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सोशल मीडिया समन्वयक प्रवीणकुमार बिरादार यांनी भाजपच्या नेत्यांनी ट्विट, फेसबुक यावर शेअर केलेल्या फेक लिंकचे स्क्रीनशॉट उघड केले आहेत. तसेच आज त्या चुकीच्या पोस्ट काहींनी डिलीट केल्याचे वा दुरुस्ती केल्याचे देखील दाखवून दिले आहे.
BJP leaders are scaming people in the name of #PMCaresFund.
— Pravinkumar Biradar (@PravinIYC) April 19, 2020
They have created a special fake website for that.
Official website : https://t.co/KzNQTsWlIg
Fake Website :https://t.co/KlMAMhkOU3
This fake site is being promoted by BJP leaders .(Check d screenshots)
(01/05) pic.twitter.com/USV0hzC34p
महाराष्ट्रातील बीजेपी नेत्यांनी आवाहन केलेल्या मध्ये स्पष्टपणे pmcaresfund.online ही लिंक दिसून येत आहे. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेली लिंक pmcares.gov.in ही आहे. त्यामुळे जी मदत केली जात आहे ती नेमकी कोणत्या अकाऊंट ला जमा होत आहे याबाबत संभ्रम निर्माण झालेला असून लवकरात लवकर याची खातरजमा होणे आवश्यक आहे..
या प्रकरणावर महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट केले असून pmcaresfund.online ही लिंक फेक आहे असे त्यांनी नमुद केले असून या फ्रॉड लिंक ची तपासणी करण्याचे सुतोवाच देखील केले आहे.
मदतीत पण फ्रॉड? का पक्षाच्या नेत्यानांच/ माजी मंत्र्यांनाच माहीत नाही पीएम केअर्स फंड कोणता आहे? ह्या फ्रॉड लिंकची तपासणी आम्ही करूच…पण,भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये. https://t.co/EWQUHUJHGd ही लिंक fake आहे. https://t.co/74qbysYEcR
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) April 19, 2020
त्यामुळे मदतीत देखील भ्रष्टाचार की नजर चुकीने ती भाजपचे माजी मंत्री, नेते, आमदार शेअर करत आहेत, काहीही असले तरी हे खरच धक्कादायक आहे..!