| डोंबिवली | समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान व स्वप्न असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या मंदिर उभारणीत सक्रिय सहभागी होत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. डोंबिवली येथील गणेश मंदिरचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर यांचेकडे पाच लाख रुपयांचा धनादेश डॉ. शिंदे यांनी सुपूर्द केला. फुल ना फुलाची पाकळी या स्वरुपात मलाही राममंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिली.
अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यानंतर आता राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियानाला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) १० अब्ज रुपये जमा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने केला आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर १००० वर्ष टिकावे, या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे. मंदिर उभारणीसाठी प्रदीर्घ लढा लढण्यात आला. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून प्रभु रामचंद्राला त्यांच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होता येणार असल्याची भावना देशभरातील भाविकांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकालाच या मंदिर उभारणीत योगदान देण्याची इच्छा असून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले योगदान दिले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .