| नवी दिल्ली | Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी सविस्तरपे स्पष्ट करण्यात आल्या. कोरोना लसीकरणा साठी http://cowin.gov.in हे पोर्टल किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबतही आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली.
आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे माहिती देत म्हटलं, ‘कोरोना लसीकरणाची तारीख घेण्यासाठी नोंदणी ही #CoWIN पोर्टलच्याच माध्यमातून करावी. #CoWIN App चा सर्वसमान्य लाभार्थींसाठी उपयोग नाही.
प्लेस्टोअरवर असणारं हे अॅप फक्त प्रशासकीय वापरासाठीच आहे‘.
सोमवारी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास http://cowin.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून झाली. 45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्ती, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि मागील वर्षभरात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशा जवळपास 20 कोमोर्बिड निकषांमध्ये मोडणाऱ्या व्यक्ती या लसीकरणाच्या टप्प्यासाठी पात्र आहेत.
कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेतील काही महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे :
✓ http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
✓ इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं “Get OTP” या बटणावर क्लिक करा.
✓ एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
✓ ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन “Verify” या बटणावर क्लिक करा.
✓ ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही “registration of Vaccination” अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.
✓ सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर “Register” या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा “Schedule Appointment” वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं “Book Appointment for Vaccination page” असाही पर्याय दिसेल.
✓ ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .