दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल

मुंबई : कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आहेत. यापूर्वी आलेल्या शासन आदेशान्वये शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकूण उपस्थिती नियंत्रित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. 

केंद्रशासनाच्या दिनांक २७ मार्च, २०२०च्या आदेशानुसार कार्यालयात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी उपस्थित राहण्यापासून दिव्यांग कर्मचा-यांना वगळण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यास अनुसरुन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती सर्वसामान्याच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने त्याचप्रमाणे दळण वळणाबाबत ऐनवेळी उद्भवणान्या अडचणींचा सामना करणे दिव्यांगाना कष्टप्रद व त्रासदायक होत असल्याने सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कार्यालयात उपस्थित राहण्यापासुन सूट देण्याची मागणी राज्य सरकारकडे पत्रान्वये केली होती. तसेच इतर अनेक कर्मचारी संघटना, एक्का फाउंडेशन ठाणे यांसारख्या स्वयंसेवी संस्था यांनी स्थानिक पातळीवर देखील या बाबत पत्रव्यवहार केला होता.

त्यामुळे या परिस्थितीत राज्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत शासकीय कार्यालयामध्ये कामकाज करण्यासाठी उपस्थित राहण्यापासून सर्व दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांना आजच्या शासन आदेशान्वये सूट देण्यात आली आहे. याच सोबत दुर्धर आजाराने ग्रस्त, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार आदी असणारे कर्मचारी यांनाही मुभा देण्याची मागणी होत आहे.


1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *