प्रति,
देवेंद्र फडणवीस साहेब,
आपल्या लाडक्या विदर्भातील आपले स्वतःचे शहर नागपूर तुमच्या हातात आहे,भाजपची सत्ता आहे, बाकी जिथे जिथे तुमची सत्ता आहे, वर्चस्व आहे ते नंतर बघू, आज घडीला नागपूरमध्ये ४० हजार ॲक्टिव कोरोना रुग्ण आहेत, रोजच्या रोज येथे तीन ते चार हजार रुग्णांची भर पडते..
महोदय तुमचे सर्व कोरोना तज्ञ म्हणजे तुमचे प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नारायण राणे, किरिट सोमय्या, छोटे राणे बंधू, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये ह्या सर्वांना नागपूर मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली घेऊन जा, लागल्यास इतर छोट्या मोठ्या पक्षातील पण अनेक तज्ञ आहेत ज्यांचा कोरोनावर प्रचंड गाढा अभ्यास आहे, या सर्वांना सोबत घ्या आणि नागपूर मध्ये कोरोना संक्रमणावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत, रेल्वे, देऊळ, बस, दुकाने, फेरीवाले व इतर सर्व अस्थापना हे बंद न करता म्हणजेच लॉक डाऊन न करता १०१ आयडिया आहेत, विशेषतः तुमच्या मोदी सरकारची म्हणजेच केंद्र सरकारची सुद्धा मदत घेवून दाखवून द्या संपूर्ण जगाला हा फडणवीस कसा चमत्कार घडवून आणतो ते, जरा दाखव ना काहीतरी करून तिथे,(आम्हाला माहिती आहे तुम्ही एकटे ही करू शकता) जसे महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका अभिमानाने ‘धारावी पॅटर्न’ सांगते तसंच आम्ही सुद्धा आपण जर नागपुर वर नियंत्रण मिळवले तर ‘फडणवीस पॅटर्न’ म्हणून तुमचे कौतुक करू, साहेब महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करताना दिसत आहात, अहो सत्ता काय येते जाते, तुमच्याच काय तुमच्या अनेकांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं पाच वर्षात तुमची सत्ता जाईल म्हणून, आज महाराष्ट्रातील मराठी माणूस कोरोनाच्या भयंकर विळख्यात आहे, कोरोना विषाणू बघत नाही हा भाजपचा आहे का शिवसेनेचा, तोंडाच्या वाफा चालवण्यापेक्षा, विरोधात बोलण्यापेक्षा खरच महाराष्ट्राचे एक लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर खरोखरच तुमचा डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध आप्पा दातार चौकात म्हणजेच फडके पथावर भव्य दिव्य सत्कार ठेवू..
जय महाराष्ट्र…!
– राजेश कदम, डोंबिवली
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .