| नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.
राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं.
१. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी
२. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण
३. मागासवर्गियांच्या पद्दोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा
४. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
५. केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत द्यावा.
६. पीक विमा अटी-शर्थींच्या सुलभीकरणावर चर्चा
७. बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
८. चक्रीवादळानंतर मदतीचे निकष बदलण्याबाबत
९. १४ व्या वित्त आयोगातील थकित निधी मिळावा
१०. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या
११.राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत
१२.नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे.