| कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यामुळे राज्यभरात शाहू महाराजांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर अभिवादन केलं जात आहे. पण, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना मोठी चूक केली आहे आणि त्यामुळे ते पुन्हा सोशल मीडियातून ट्रोल होऊ लागले आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन असल्यामुळे राज्यातील नेते मंडळीपासून सर्वसामान्य नागरिक शाहू महाराजांना अभिवादन करत आहेत. सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे शाहू महाराजांना अभिवादन करत नेते मंडळींनीही पोस्ट टाकल्या आहेत.
आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनीही शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केलं. पण, या ट्वीटमध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांना ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून संबोधलं.
वास्तविक पाहता मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळीला राजाश्रय त्यानींच मिळवून दिला. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ते ट्विट डिलीट करून अभिवादनचा नवीन व्हिडिओ शेअर केला..
सामाजिक क्रांतीचे जनक वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन! pic.twitter.com/iqpvo5bhmW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 6, 2020
दरम्यान शाहू महाराजांबद्दल चुकीचं ट्वीट करूनही अद्याप फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारची दिलगिरी अथवा माफी मागितली नाही. त्यामुळे ट्वीटरवर त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलचा सामना करावा लागला आहे. परंतु, यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस मात्र स्वत: चूक करून टीकेचे धनी ठरले आहेत..
येड्याची जतरा