| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने सुरु असलेल्या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर खोचक पणे निशाणा साधताना म्हटले आहे की, घरबसल्या पैसे कमवा.. संध्याकाळनंतर पेट्रोल डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा. या ट्विटमध्ये आव्हाड यांनी मॉर्फ केलेला एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर असून त्यावर अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पूरे १०० असं लिहिलेले आहे. तसेच देशाचा जीडीपी G- Gas, D-Diesel, P- Petrol वाढतोय, असा खोचक टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच डिझेलचा दर हा पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे मोदी सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून आवाज उठवणाऱ्या सेलिब्रिटींनाही लक्ष्य केले होते. आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार, महानायक अमिताभ बच्चन आणि भाजप नेत्या स्मृती ईराणी यांचे इंधन दरवाढीचे जुने ट्विट रिट्विट करून त्यांना आता वाढलेल्या इंधन दरवाढीवरून खोचक सवाल विचारले होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .