| ठाणे | ठाण्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालकमंत्री बदली करा, अशी घरबसल्या मागणी करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या बुद्धीची किव येत असल्याची टिका कल्याण डोंबिवली महापालिकेचे सभागृह नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाण्यातील पत्रकारांशी संवाद साधत पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. त्यावर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, नेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यासह शेलार यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण असे ठिकठिकाणी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. पायाला भिंगरी लागल्यासारखे दिवसरात्र पालकमंत्री अजिबात उसंत न घेता प्रयत्नशील आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वत: पीपीई किट घालून ते सिव्हिल रुग्णालयातील कोरोना वॉर्डातही गेल्याचे सर्वश्रुत आहे. अशा १८ – १८ तास फिल्डवर उतरून लोकांसाठी झटणाऱ्या व्यक्तीबाबत बोलण्याचाआशिष शेलार यांना अजिबात नैतिक अधिकार नसल्याचे प्रकाश पेणकर यांनी सांगितले. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या नावाखाली उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार त्यांनी त्वरित थांबवावे अशा शब्दांत सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी शेलार यांच्या टिकेचा अतिशय खरपूस समाचार घेतला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे या कठीण काळात एकही दिवस घरी बसून आराम करत असल्याचे अजिबात दिसून आलेले नाही. दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ठाण्यापासून शहापूर, मुरबाड अगदी पालघर, मुंबई, कोकणात आपले सेवेचे काम बजावत आहेत. त्यामुळे आशिष शेलारांची ही फुसकी टीका त्यांच्या अंगावर उलेटलेली दिसून येत आहे.- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .