| मुंबई | भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेते चीनवर केवळ शाब्दिक हल्ले करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे सीमेवरील लाल माकडे पळून जातील, असे त्यांना वाटते. एवढेच नव्हे तर चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी सातत्याने चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. हा हल्ला परतवून लावण्यासाठी चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला मोठी आर्थिक देणगी मिळाल्याचा मुद्दा भाजपने उकरून काढला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि दिल्लीतील प्रमुख नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी वकिलातीकडून देणगी मिळाली, हा फुगा भाजपने फोडला. मात्र, ही माहिती प्रसिद्ध झाल्याने सीमेवरील चीनच्या हालचालींवर निर्बंध येणार आहेत का? राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांचा संबंध चिनी घुसखोरी किंवा आमचे २० जवान शहीद झाले त्या घटनांशी असेल तर भाजपने तसे स्पष्ट करावे. आपल्या देशातील अनेक राजकीय पुढारी आणि पक्ष परराराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने तर यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वत:च्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.
तसेच सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नवे बांधकाम सुरु झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडका मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाशी भाजपला केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .