ब्लॉग : ‘ येथे कर माझे जुळती ‘

कर्तव्य कठोर नेता..!
ठाण्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या चर्चेत आहेत. या कोरोनाच्या संकटकाळात जिथे कित्येक नेते, आमदार जनतेसाठी कवारांटाईन आहेत, तिथे एकनाथ शिंदे दहापट अधिक वेगाने काम करताना दिसत आहेत. सकाळी ठाणे , दुपारी कल्याण , संध्याकाळी शहापूर, रात्री नवी मुंबई अश्या आढावा बैठका, प्रशासनाच्या अडचणी समजून घेत या संकटकाळात धैर्याने उभे आहेत..! त्यात मुंबईतील १००० खाटांचे रुग्णालय असेल , ठाण्यातील १००० खाटांचे असेल हेही त्यांच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणात पूर्ण होत आहे. अन्न पुरवठा, जीवनावश्यक वस्तू पुरवठा, निवारा केंद्र, रोगप्रतिकरकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या वाटप, औषध फवारणी असेल, नालेसफाई असेल सगळीकडे हाच व्यक्ती दत्त म्हणून उभा आहे..! ठाणे महापालिकेने तर कामाची अफाटता पाहून अभिनंदनाचा ठराव देखील घेतला आहे. इतका प्रचंड कष्ट करणारा नेता क्वचितच दिसतो..! त्यातीलच एक घटनेवरील हा ब्लॉग..!

एका अशा ध्येयवेड्या व्यक्तीसोबत काम करत आहे…ज्याला थांबण माहीत नाही…अविश्रांत आणि अविरत मेहनत करणं हेच जणू आपलं जीवितकार्य आहे असं समजून गोरगरीब जनतेसाठी सदैव कार्यरत असणारे व्यक्तीमत्व..वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मावीर आनंद दिघे साहेब यांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे भाई.. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब..!

खरं तर आज, ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खाटांची क्षमता वाढविण्यासाठी प्रिफॅब्रिकेटेड पोटा केबिनच्या सुरुवात करण्याचा नियोजित कार्यक्रम होता…यातील १५० बेडपैकी ६ oxygen बेड आज तयार झाले याचे आज लोकार्पण करण्यात आले… आणि, अचानक पालकमंत्री यांनी विचारले, कोविड वार्ड कुठे आहेत..? तिथे किती रुग्ण आहेत..?? त्यांना काही समस्या आहेत का..??? मला त्यांना समक्ष भेटायाचे आहे.. 

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपसंचालक डॉ गौरी राठोड, सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार सर यांनी आवश्यकता नाही, वॉर्ड मध्ये व्हिडिओ conf यंत्रणा आहे, ऑफिसमधूनच आपण संवाद साधू शकतो असे सर्वांनीच सांगितले…

पण जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या माणसाचा निर्धार कुणीच रोखू शकत नाही…तात्काळ PPE किट मागविले गेले आणि पालकमंत्री थेट कोविड वॉर्ड मध्ये पोहोचले…

सेनापतीच रणांगणात आल्यावर आम्ही सैन्य कसे मागे राहणार..विशेष कार्य अधिकारी डॉ चारुदत्त शिंदे आणि आम्हीही तात्काळ PPE घालून सोबत गेलो…

आरोग्य उपसंचालक डॉ गौरी राठोड आणि रात्रीचा दिवस करून अथक मेहनत घेणारे सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार, डॉ माधव भंडारी, विनोद जोशीही PPE किट घालून मा.पालकमंत्री समवेत कोविड वार्डात दाखल झाले…

एका पाठोपाठ एक अशा जवळपास सर्वच कोविड वार्डात पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी थेट भेट दिली आणि संवाद साधला… जेवणाची समस्या आहे का..? गोळ्या – औषध वेळेवर भेटत आहेत का..?? असे एक ना अनेक प्रश्न विचारत बिनधास्त बोला, घाबरू नका असे सांगत प्रतेकाला आश्वस्त करत होते… कोरोनाला घाबरू नका, योग्य उपचार चालू आहेत, तुम्ही लवकरच बरे व्हाल…असे सांगत भाई सर्वांना आधार देत होते…रुग्णही सकारात्मक प्रतिसाद देत होते…

दरम्यान, इथे कोविड वार्डात दररोज सेवा देणारे डॉ भंडारी यांनी कोविडग्रस्त रुग्णांमध्ये सकारात्मक विचार यावेत आणि मानसिक आधार मिळावा यासाठी दररोज म्हटली जाणारी सामूहिक प्रार्थना म्हणायला सुरुवात केली…सर्व रुग्ण, आम्ही सर्व आणि स्वतः भाई प्रार्थना म्हणू लागले….

हम होंगे कामयाब..हम होंगे कामयाब…हम होंगे कामयाब एक दिन..हो..हो…मन मे है विश्वास… पुरा है विश्वास….हम होंगे कामायब एक दिन…गाणे म्हणत भाईंनी या कोविडग्रस्त रुग्णांला मानसिक आधार दिला

याच कोविड वार्डातून निघताना एक मुलगी भेटली, तिच्या आईलाही कोरोनाची लागण झालेली होती…आम्ही कोविड वॉर्डातून निघताना ती म्हणाली , साहेब…आम्ही मूळचे कोल्हापूरचे आहोत, इथे ठाण्यात नातेवाईकांकडे आलोत आणि कोरोनाग्रस्त झालो…पण तुम्ही आहात आम्हाला काळजी न्हाई.. कारण महापुरात देखील आपणच आमच्या मदतीला धावून आला होता…पण , साहेब तुम्हीही काळजी घ्या…

हे शब्द ऐकून, PPE किटच्या विशेष चष्मा आणि faceshild मधून देखील भाईंच्या डोळ्यांत – चेहऱ्यावर कृतकृत्य भाव उमटले…ते पाहिले आणि पुढच्या कोविड वार्डच्या दिशेने आमचे पाऊल पडले..कोविड लढाईविरोधात कामयाब होण्यासाठी…

मंगेश चिवटे..

3 Comments

  1. मा.एकनाथ शिंदे साहेबांना मानाचा मुजरा.,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *