| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जून महिन्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली यावरुन राजकारण तापले होते. मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करत हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र अद्यापही याचा तपास लागू शकलेला नाही. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल केला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘सीबीआयने तपास सुरू करून आता पाच महिने उलटले आहेत. मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत’
अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या घरात आढळला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा सुरू झाला. त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर त्याची हत्या करण्यात आल्याचेही म्हटले गेले. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडे होती. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुड उलगडलेले नाही.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .