| नवी दिल्ली | चंद्रकांत पाटील हे आता गुजरात भाजपचे नवे अध्यक्ष असतील. हे वाक्य ऐकल्यानंतर आपण अजिबात गोंधळू नका. नाही नाही महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ नाही झाली. कारण हे चंद्रकांत पाटील म्हणजे सीआर पाटील आहेत गुजरातचे. आज भाजपने त्यांची गुजरात प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
गुजरात मध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे एकाच नावाचे दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यात एकाच पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष या एकाच पदावर नियुक्त ठेवण्याचा अनोखा योग मात्र दिसतोय.
सी आर पाटील हे २०१९ मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गुजरात मधले मोदींचे सर्वात जवळचे खासदार अशी त्यांची ओळख दिल्लीत आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातल्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम सीआर पाटील पाहायचे. खासदारांना शासकीय बंगल्याचे वाटप करणाऱ्या हाउसिंग कमिटीवर अध्यक्ष म्हणूनही त्यांची सध्या नियुक्ती आहे. ६५ वर्षांचे जीआर पाटील हे हे मूळचे जळगाव मधील १९८९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला सुरत मध्ये स्थानिक पातळीवर ती वेगवेगळी पदे सांभाळली. २००९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. सी आर पाटील हे मराठी व्यक्ती गुजरात भाजपची धुरा सांभाळताना दिसतील. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसने हार्दिक पटेल यांची गुजरात कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील ही लढाई कशी रंगते हे पाहणं उत्सुकतेचे असेल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .