जैविक अस्त्र कायद्याचे जनक डॉ. फ्रान्सिस बॉयल यांनी हा आरोप केला आहे.
मुंबई –चीनने आपल्या वुहान पी 4 प्रयोगशाळेत जैविक अस्त्र म्हणूनच कोरोना विषाणू तयार केला. इतर देशांतून संहार घडवून आणणे हेच चीनचे यामागचे उद्दिष्ट होते. पण काही कारणांमुळे विषाणू वुहानमधील पी 4 प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि वुहानमधून हुबेई प्रांतात फोफावला. जैविक अस्त्र कायद्याचे जनक डॉ. फ्रान्सिस बॉयल यांनी हा आरोप केला आहे.
डॉ. फ्रान्सिस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, वुहान कोरोना विषाणू तयार करणे हा जैविक अस्त्र कायद्यानुसार चीनने केलेला गुन्हा आहे. मानवतेविरुद्ध अपराधाच्या श्रेणीत मोडणारा हा गुन्हा आहे. हा गुन्हा घडत असताना जागतिक आरोग्य संघटना जणू मूक साक्षीदार बनलेली होती आणि पुढेही या संघटनेने हीच भूमिका बजावली, हे आणखीच गंभीर आहे.
फ्रान्सिस हे ‘इल्लिनॉईस कॉलेज ऑफ लॉ’मध्ये आंतरराष्ट्रीय कायदा या विषयाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकेतील जैविक अस्त्र परिषदेदरम्यान त्यांनी देशांतर्गत अंमलबजावणीसाठी ‘बायोलॉजीकल वेपन्स अँटी टेररिज्म अॅक्ट’चा मसुदा तयार केला होता. जॉर्ज बुश यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांतून तो कायदा म्हणून मंजूर झाला होता. ‘जिओपॉलिटिक्स अँड एम्पायर’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. फ्रान्सिस यांनी कोरोनाबाबत सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, ‘वुहानमधील बीएसएल-4 लॅब म्हणजे केवळ चीनचे व्हायरॉलॉजी सेंटर नाही, तर ती जागतिक आरोग्य संघटनेचीही संशोधन शाळा आहे. अर्थात हे सेंटर म्हणजे एका अर्थाने चीन आणि जागतिक आरोग्य संघटना अशी दोघांची संयुक्त प्रयोगशाळा आहे. तिथे काय चालते, ते जागतिक आरोग्य संघटनेकडून लपलेले नसते.’
चीनने चोरला कॅनडातून कोरोना!
कोरोना विषाणूचे मटेरियल चीनने कॅनडातील प्रयोगशाळेतून चोरले, असा गौप्यस्फोटही डॉ. फ्रान्सिस यांनी केला आहे.