| मुंबई | मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी एक दिवस जाणार आहे. त्यामुळे १४ मे पासून ही होम डिलिव्हरीची सुविधा सुरु केला जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. वाईन शॉप बाहेर होणाऱ्या गर्दीपासून सुटका व्हावी आणि कोव्हिड -19 रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी ही ई – टोकन सुविधा सुरु करण्याच निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केला आहे.
असे काढाल ई – टोकन
ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई – टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून दारू खरेदी करु शकणार आहे.- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
Desi