| मुंबई | महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे’, अशी मागणी या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असंही थोरात म्हणाले.(conflict in Mahavikasaaghadi)
‘राज्याचे काही प्रश्न घेऊन एकत्र चर्चा केली. चक्रीवादळ झालं त्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवर गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांसाठीही आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करणं अपेक्षित आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू,’ अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. (conflict in Mahavikasaaghadi)
काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .