| मुंबई | कोरोनाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांवर ३ जून रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्वच किनारपट्टीलगत भागांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.(cyclone in mumbai)
अरबी समुद्रात बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्टयावरून भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिला. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, येत्या १२ तासांत वेगवान वारे वाहतील. त्याचेच चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे, मुंबई आणि सभोवतालच्या भागात अलर्ट जारी करण्यात आला. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे दोन पथक पालघर, तीन मुंबईत, एक ठाणे, दोन रायगड आणि एक रत्नागिरी येथे तैनात करण्यात आले आहेत.- मच्छिमारांना समुद्रातून परतण्याचे निर्देश.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा दबाव ताशी ११ किमीच्या वेगाने पूर्व आणि मध्य अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकत आहे. मंगळवारी सकाळी साडे पाच वाजल्यापासून त्यात वेग आला आहे. सध्या पणजीपासून २८० किमी दूर पश्चिम-दक्षिण, मुंबईपासून ४९० किमी दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि सुरत येथून ७१० किमीवर दक्षिण-दक्षिणी पश्चिम येथे केंद्र आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, या चक्रीवादळामुळे समुद्रात २ मीटर उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि रायगडच्या खालच्या भागांवर दिसून येईल. त्यामुळेच मच्छिमारांना सागरातून परत येण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोबतच, किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना दूर पाठवले जात आहे.(cyclone in mumbai)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री