| नवी दिल्ली | दिग्गज नेते, सेलेब्रिटी आणि कंपन्यांचे ट्विटर अकाऊंट बुधवारी हॅक करण्यात आल्याने सोशल मीडियात खळबळ माजली आहे. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये माइक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, बराक ओबामा, इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, वॉरेन बफेट, अॅप्पल, उबरसह अन्य ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत.
याबाबत ट्विटरने सांगितले आहे की, ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम सुरु आहे, अनेक दिग्गजांचे प्रोफाइल ट्विटर अकाऊंट एकत्र क्रिप्टोकरंसीज घोटाळ्यासाठी हॅक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
बिल गेट्स यांच्या अकाऊंटमध्ये पोस्ट करण्यात करण्यात आले आहे की, प्रत्येकजण मला परत देण्यास सांगत आहे, आता वेळ आली आहे. तुम्ही मला एक हजार डॉलर्स पाठवा, मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स परत पाठवीन.
टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांच्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, पुढील एक तासात बिटकॉइनमध्ये पाठवलेली रक्कम दुप्पट होऊन तुम्हाला परत केली जाईल. बिटकॉइन पत्त्याच्या लिंकसह ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. मी कोविड साथीच्या आजारामुळे दान करीत आहे.
अमेरिकेचे प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टसोबत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमधील उबर आणि अॅपल यांचे ट्विटर अकाऊंटही हॅक करण्यात आले आहेत.
अल्पावधीतच, शेकडो लोकांनी हॅकर्सना दहा लाखांहून अधिक डॉलर्स पाठविले. ज्या अकाऊंटला लक्ष्य केले होते त्यांना लाखो फॉलोअर्स होते, या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यात येत असून लवकरच अधिकृत निवेदन सादर करण्यात येईल असे ट्विटरने स्पष्टीकरण दिले आहे.
हे अकाउंट हॅक केल्यानंतर, सर्व अकाउंट्सवरून ट्विट करत बिटकॉईच्या स्वरुपात पैशांची मागणी केली जात होती. ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत प्रचंड आहे. गुंतवणुकीचा विचार करता, लोकांना हे अत्यंत आकर्षक वाटते. सध्या हे जगातली सर्वात महाग चलन आहे. एका बिटकॉईनची किंमत ७ लाख रुपयांच्या जवळपास आहे. सायबर सिक्योरिटीच्या अल्पेरोविच यांनी सांगितले, की या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांना मोठे नुकसान झाले आहे. हॅकर्सने जवळपास ३०० लोकांकडून तब्बल १ लाख १० हजार डॉलर बिटकॉईन उकळले आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .